२६ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन
By Admin | Updated: September 15, 2016 02:57 IST2016-09-15T02:57:03+5:302016-09-15T02:57:03+5:30
२६ माध्यमिक शिक्षकांचे जिल्हा स्तरावर समायोजन झाले असून, उर्वरित ३७ शिक्षकांचे समायोजन विभाग स्तरावर होणार.

२६ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन
वाशिम, दि. १४ : खासगी अनुदानित शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या २६ माध्यमिक शिक्षकांचे जिल्हा स्तरावर समायोजन झाले असून, उर्वरित ३७ शिक्षकांचे समायोजन विभाग स्तरावर होणार आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १९९ खासगी माध्यमिक शाळा आहेत. सन २0१३-१४ च्या संच मान्यतेनुसार ४६ आणि सन २0१५-१६ च्या संच मान्यतेनुसार १७, असे एकूण ६३ शिक्षक अतिरिक्त आहेत. या शिक्षकांचे समायोजन अन्य शाळांमध्ये रिक्त पदावर करणे बंधनकारक आहे. मध्यंतरी २0१५-१६ च्या संच मान्यतेनुसार किती शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, याबाबतची माहिती प्रत्येक शाळांकडून शिक्षण विभागाकडे येण्यास विलंब झाला. यामुळे समायोजन प्रक्रिया लांबणीवर पडली होती. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. शाळांकडून ऑनलाइन माहिती आल्यानंतर १४ सप्टेंबर रोजी स्थानिक जिजाऊ सभागृहात समुपदेशन पद्धतीने समायोजन प्रक्रियेला सकाळी ११ वाजतापासून प्रारंभ झाला. सभागृहाबाहेर अतिरिक्त शिक्षक आणि रिक्त असलेल्या जागांची प्रवर्गानिहाय शाळांची यादी प्रकाशित केली होती. ऑनलाइन समुपदेशनमध्ये या यादीतील काही शाळांची नावेच आली असल्याचा आरोप यावेळी काही शिक्षकांनी केला. यावेळी जिल्हा स्तरावर २६ शिक्षकांचे समायोजन झाले असून, उर्वरित ३७ शिक्षकांसाठी प्रवर्गनिहाय जागा जिल्ह्यात रिक्त नसल्याने त्यांचा अहवाल विभाग स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी दिली.