Additional chief executive officer take charge at Washim ZP | वाशिम येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूजू; अन्य दोन अधिकाऱ्यांची प्रतिक्षा

वाशिम येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूजू; अन्य दोन अधिकाऱ्यांची प्रतिक्षा


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड यांनी सोमवार, १९ आॅगस्ट रोजी सूत्रे स्वीकारली आहेत तर  अन्य दोन अधिकाºयांची प्रतिक्षा कायम आहे.
वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची ३० आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६५ अधिकाºयांची पदे रिक्त असून, १५  दिवसांपूर्वी वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशा चार रिक्त पदांचे ग्रहण यामुळे सुटले. यापैकी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणून डॉ. विनोद नारायणराव वानखेडे हे यापूर्वीच रूजू झाले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड यांनी १९ आॅगस्टला सूत्रे स्वीकारली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) एस.एस. पाटील तसेच वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झालेले एस.एम. मठपती अद्याप रूजू झाले नाहीत. 
अद्याप जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, कृषी विकास अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी यासह वर्ग एकचे २६, वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६१ अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. रिक्त पदांमुळे कामकाजात खोळंबा निर्माण होत आहे.

Web Title: Additional chief executive officer take charge at Washim ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.