शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 10:57 AM

पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी ५ एप्रिल रोजी केले.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध आता पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली असून, गत दोन दिवसांत जिल्ह्यात २५० पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली. नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी ५ एप्रिल रोजी केले.कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगभरात झपाट्याने वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. नागरिकांनी घरातच रहावे, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी अथवा औषधी खरेदीसाठी शक्यतो एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे केले जात आहे. तथापि, काही जण अत्यावश्यक काम नसतानाही रस्त्यावरून फिरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. या पृष्ठभूमीवर अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणाºया नागरिकांची वाहने जप्त करणे, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या दरम्यान नागरिकांनीदेखील गांभीर्य लक्षात घेऊन घरातच राहणे संयुक्तिक आहे. परंतू काही जण अद्यापही कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असून, वाहने जप्त करणे, गुन्हे दाखल केले जात आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस