शिरपूर जैन येथे दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: June 24, 2016 23:34 IST2016-06-24T23:34:57+5:302016-06-24T23:34:57+5:30

एकाच समाजाच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून झाला वाद; पाच जण जखमी.

Action in two groups at Shirpur Jain | शिरपूर जैन येथे दोन गटांत हाणामारी

शिरपूर जैन येथे दोन गटांत हाणामारी

शिरपूर जैन (जि. वाशिम): येथील एकाच समाजाच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले. ही घटना २४ जून रोजी घडली. गावात तणावपूर्ण शांतता असून, तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शिरपूर येथे किरकोळ कारणावरून अल्पसंख्याक समाजाच्या दोन गटांत शुक्रवारी दुपारच्या सुमारास हाणामारी झाली. यामध्ये शेख कलीम शे. नबी, शे. सलीम शे. नबी, गुलाम हुसेन दस्तगीर, शे. लुकमन शे. बिराम हे जखमी असून, शे. हसन शे. दस्तगीर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वाशिम येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. उर्वरित चार जखमींवर मालेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परस्परविरोधी तक्रारींवरून माजी जिल्हा परिषद सदस्य मो. इमदाद बागवान यांच्यासह दोन्ही गटांच्या एकूण ३१ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. शिरपूर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली आहे.

Web Title: Action in two groups at Shirpur Jain