शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मालेगाव येथील दरोडा, खून प्रकरणातील आरोपी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 16:58 IST

Accused in Malegaon robbery, murder case arrested! अजाबराव पंजाबराव घुगे (४०) रा. सुकांडा ता. मालेगाव या मुख्य आरोपीला अटक केली.

वाशिम : मालेगाव येथील सराफा व्यावसायिकाच्या लुटमार व कामगार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. याप्रकरणात अजाबराव पंजाबराव घुगे (४०) रा. सुकांडा ता. मालेगाव या मुख्य आरोपीला अटक केली असून, दोन गावठी कट्टे, २.४० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शनिवार, २५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.२१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर व त्यांचे कामगार रविंद्र वाळेकर दोघेही रा. मालेगाव हे दोघे रात्री ९ वाजेच्या दरम्यान घरी बॅग घेऊन जात असताना, तीन मोटार सायकलवरून आलेल्या ५ ते ६ दरोडेखोरांनी मिरची पूड डोळयांत टाकली, चाकूने वार केले आणि गावठी कट्टयातून गोळीबार केला होता. रवींद्र वाळेकर याने दरोडेखोरांचा प्रतिकार केल्याने त्याचेवर चाकूने वार करून बंदुकिची गोळी झाडली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला तर सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हेसुद्धा गंभीर जखमी झाले. उपचारादम्यान रवींद्र वाळेकर यांचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी योगेश अंजनकर यांचेजवळील ९ लाख न हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग घेऊन दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला होता. याप्रकरणी अज्ञात आरोपितांविरुद्ध कलम ३९६, ३९७ भादंवि मालेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करीत आरोपीच्या शोधार्थ सहा पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली. मालेगाव पोलीस तथा गुन्हे शाखेच्या चमुने गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिकदृष्ट्या तपासाची चक्रे फिरवून अवघ्या ४८ तासात मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथून अजाबराव पंजाबराव घुगे या मुख्य आरोपीस अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी कट्टे आणि दोन लाख ४० हजाराचे ५३ ग्रॅम सोने जप्त केले. या प्रकरणातील उर्वरीत आरोपी लवकरच पोलीसांच्या हाती येतील, असेही शेवटी पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी सांगीतले.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम