अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस २४ तासात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST2021-07-15T04:28:03+5:302021-07-15T04:28:03+5:30
तालुक्यातील घोटा येथील एका महिलेने ११ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दिली की, १० जुले रोजी फिर्यादी महिला शेताचे काम ...

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस २४ तासात अटक
तालुक्यातील घोटा येथील एका महिलेने ११ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दिली की, १० जुले रोजी फिर्यादी महिला शेताचे काम करून घरी परत आली असता, फिर्यादीची १५ वर्षीय मुलगी घरी दिसली नाही. तिचा आजुबाजूला व नातेवाइकांकडे शोध घेतला असता, तिचा शोध लागला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने मुलीस पळवून नेले, अशी तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरविली असता, रोशन पांढरे (१९) रा. घोटा याने मुलीस पळवून नेल्याचे समोर आले. सायबर सेलच्या आधारे मुलगी व आरोपी हे पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे महादेव सोळंके व अरविंद सोनोने यांनी आरोपी व मुलीस १२ जुलै रोजी पुणे येथून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास एपीआय तुषार जाधव यांच्याकडे देण्यात आला.
००००
पाेस्को कलम वाढविले
या प्रकरणातील आरोपीला २४ तासात अटक करण्यात आली, तसेच आरोपी विरुद्ध कलम ३६६, ५०६ व पोस्को कलम वाढविण्यात आले.