फसवणूकप्रकरणी आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:43 IST2021-09-11T04:43:06+5:302021-09-11T04:43:06+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव नीलेश भाकरे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, अडतदार पवन भगत, ...

फसवणूकप्रकरणी आरोपीस अटक
कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव नीलेश भाकरे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, अडतदार पवन भगत, कारंजा व रवी इंगोले, कारंजा या दोघांनी संगनमत करून शेतकऱ्यांकडून मार्च, एप्रिल व मे महिन्यांत चना, तूर, गहू हा शेतमाल जास्त दराने देण्याचे तोंडी व्यवहार करून शेतमाल खरेदी केला. शेतकऱ्यांना मालाचे वजन, दर व एकूण किमतीची पावती नंतर देतो, असे सांगितले; मात्र आजपर्यंत पैसे दिले नाही. काही शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाचे धनादेश दिले. ते देखील अनादरित झाले. आता आरोपींनी फोन बंद करून ठेवला. अशा फिर्यादीवरून पवन भगतविरुद्ध कलम ४२० व ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास शहर ठाणेदार आधारसिंग सोनोने करीत आहेत.