शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

हैदराबाद येथील चिमुकल्याचे अपहरण करणारा आरोपी गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:18 PM

Crime News शाम भीमराव सोळंकी याला मालेगाव, जऊळका व हैदराबाद पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी चिमुकल्यासह अमानवाडी येथून ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे शाम सोळंकी याने रुद्रमणी शिवकुमार या चिमुकल्याचे अपहरण करण्याचा बेत आखला. १० फेब्रुवारी रोजी मूळ गावी अमानवाडी येथे आरोपी हा चिमुकल्यासह पोहचला.

मालेगाव : हैदराबाद येथील तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करणाºया मालेगाव तालुक्यातील अमानवाडी येथील २३ वर्षीय आरोपी शाम भीमराव सोळंकी याला मालेगाव, जऊळका व हैदराबाद पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी चिमुकल्यासह अमानवाडी येथून ताब्यात घेतले.अमानवाडी येथील शाम भीमराव सोळंकी हा रोजगारानिमित्त हैदराबाद येथे गेला होता. दरम्यान ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हैदराबाद येथे रुद्रमणी शिवकुमार एस. हा ३ वर्षीय चिमुकला त्याच्या दोन बहिणींसोबत एका हॉटेलसमोर खेळत असताना आणि त्याचवेळी त्याची आई पाणी आणण्यासाठी बाहेर गेल्याची संधी साधून शाम सोळंकी याने रुद्रमणी शिवकुमार या चिमुकल्याचे अपहरण करण्याचा बेत आखला. घटनास्थळावरून  चिमुकल्याला सोबत घेत हैदराबाद रेल्वे स्टेशन गाठले आणि तेथून सेवाग्राम, अकोला रेल्वे स्टेशन असा प्रवास करीत अकोला येथून बसने मालेगाव गाठले. १० फेब्रुवारी रोजी सकाळी जऊळका मार्गे मूळ गावी अमानवाडी येथे आरोपी हा चिमुकल्यासह पोहचला. दरम्यान, हैदराबाद येथे रुद्रमणी शिवकुमार याच्या आईने आपल्या मुलाचे अपहरण शाम सोळंकी याने केल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली. या तक्रारीच्या आधारे हैदराबाद पोलिसाचे पथक १७ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे पोहचले. हैदराबाद व मालेगाव पोलिसांनी अमानवाडी रेल्वे स्टेशन व परिसरात आरोपीसह चिमुकल्याचा शोध घेतला. परंतू, शोध न लागल्याने आरोपी व चिमुकल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. यावरून व्हिडीओमधील वर्णनाचा मुलगा व आरोपी हा ग्राम अमाणवाडी येथील एका मंदिराचे मागे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, आरोपी व चिमुकल्यास ताब्यात घेतले. बालकासह आरोपीला हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. ही कारवाई मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात गजानन काळे, कुलदीप ताजणे, समाधान मोघाड यांनी पार पाडली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी