वाशिम वनविभागाचा लेखापाल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 10:40 AM2021-01-09T10:40:35+5:302021-01-09T10:40:45+5:30

Washim News शिविगाळ केल्याप्रकरणी वाशिम वनविभागाच्या लेखापालास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Accountant of Washim Forest Department suspended | वाशिम वनविभागाचा लेखापाल निलंबित

वाशिम वनविभागाचा लेखापाल निलंबित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालकांशी ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा फोनवर उद्धटपणे बोलून शिविगाळ केल्याप्रकरणी वाशिम वनविभागाच्या लेखापालास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एस. व्ही. रामाराव यांनी ८ जानेवारी रोजी केली.
यासंदर्भातील तक्रारीत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी नमूद केले आहे की, वाशिम वनविभागात कार्यरत लेखापाल संतोष शत्रुघ्न धनोकार याने ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्रीच्या सुमारास माझ्या मोबाइलवर फोन करून यवतमाळ वनविभागांतर्गत बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळाची बैठक केव्हा होईल, अमरावतीमधून आपण बदल्या कसे करता? असे प्रश्न केले. मुख्य वनसंरक्षकांशी संपर्क साधण्याचे सांगून मी फोन बंद केला; मात्र त्यानंतर पुन्हा धनोकारने फोन करून वरिष्ठ कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. 
याप्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १ जानेवारी २०२१ रोजी मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार करून धनोकारवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी व त्यास तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली होती. त्यावरून लेखापाल संतोष धनोकार यास ८ जानेवारी रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
 

Web Title: Accountant of Washim Forest Department suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.