समृद्धी महामार्गावर अपघात; तीन जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 16:11 IST2023-04-02T16:08:13+5:302023-04-02T16:11:22+5:30
मालेगावपासून शेलूबाजारकडे जाणाऱ्या मार्गाजवळ काही अंतरावर चालकाचे कारच्या स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले

समृद्धी महामार्गावर अपघात; तीन जण गंभीर
वाशिम : पुणे येथून नागपूरकडे समृद्धी महामार्गाने जात असताना मालेगावजवळ (जि.वाशिम) चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगात असलेली कार खड्यात जाऊन उलटली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले.
पुणे येथील भिसे कुटुंबिय नागपूरकडे समृद्धी महामार्गाने कारने जात होते. कारमध्ये संतोष राजाराम भिसे (वय ३७), प्रियंका संतोष भिसे (वय ३४) व अद्विका संतोष भिसे (वय ५) असे तिघे जण होते. मालेगावपासून शेलूबाजारकडे जाणाऱ्या मार्गाजवळ काही अंतरावर चालकाचे कारच्या स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव असलेली कार खड्ड्यात जाऊन उलटली. यामध्ये कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने वाशिम येथील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले.