गाडीचा टायर फुटल्याने समृद्धीवर अपघात, तीन जण जखमी
By नंदकिशोर नारे | Updated: May 22, 2023 13:37 IST2023-05-22T13:37:34+5:302023-05-22T13:37:47+5:30
वैष्णवीच्या डाेक्याला गंभीर दुखापत तर अंकुश पुसदकर यांचा हात फॅक्चर झाला आहे.

गाडीचा टायर फुटल्याने समृद्धीवर अपघात, तीन जण जखमी
वाशिम : समृध्दी महामार्गावरील मालेगाव टाेलप्लाझाजवळ २२ मे राेजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान कारचा टायर फुटल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
मालेगाव टाेल प्लाझापासून ५०० मीटर अंतरावर चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. २७ बी.झे. ०४४० ही मुंबईकडे जात असताना टाेल प्लाझापुढे गेल्याबराेबर टायर फुटल्याने वाहनाने दाेन तीन पलटी घेतल्या. यामध्ये वैष्णवी ठाकुर (वय १९), अंकुश पुसदकर (वय ५५), आयातसिंग ठाकुर (वय ५१) हे गंभीर जखमी झालेत.
वैष्णवीच्या डाेक्याला गंभीर दुखापत तर अंकुश पुसदकर यांचा हात फॅक्चर झाला आहे. सदर अपघात या रस्त्यावरुन जात असलेल्या प्रवाशांनी पाहताच १०८ रुग्णवाहिकेलार काॅल करुन घटनेची माहिती दिली. रुग्णवाहिका चालक राहुल सांगळे व डाॅ. दीपक पाटील यांनी वेळेवर पाेहचून जखमींना वाशिम येथील क्रिटीकल केअर सेंटरला दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.