शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

‘नाफेड’ तूर स्वीकारेना; व्यापाऱ्यांनी पाडले दर!

By admin | Updated: April 21, 2017 01:09 IST

ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात : हमीदर ५,०५०; व्यापाऱ्यांकडे मिळतोय ४ हजार रुपये सरासरी दर

वाशिम : शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ५० रुपये हमीदराने तूर खरेदी करणाऱ्या ‘नाफेड’ने १५ एप्रिलपासून शेतकऱ्यांकडील तूर स्वीकारणे बंद केले. परिणामी, तोंडावर असलेल्या खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात माल विक्री करणे सुरू केले असून, व्यापाऱ्यांकडून तुरीला केवळ ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यात मालेगाव, कारंजा, वाशिम आणि अनसिंग येथे महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने (एमएससीएमएफ), मंगरुळपीर येथे विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने (व्हीसीएमएफ); तर रिसोड येथे फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या माध्यमातून ‘नाफेड’ने तूर खरेदी केंद्र उभारले होते. मात्र, सुरुवातीपासूनच या ना त्या कारणांनी हमीदराने सुरू असलेल्या ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांना अक्षरश: जेरीस आणले. मध्यंतरी बारदाना संपल्याचे कारण समोर करून तब्बल १५ ते २० दिवस तूर खरेदी बंद पाडण्यात आली. त्यामुळे खरेदी केंद्रांवर पडून असलेल्या तुरीची रखवाली करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर या समस्येवर तोडगा निघत तूर खरेदीची प्रक्रिया पूर्ववत झाली असताना १५ एप्रिलपासून पुन्हा शेतकऱ्यांकडील तूर स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. या मुदतीच्या आत ज्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्रांवर पडून आहे, ती २२ एप्रिलपर्यंत मोजणी करून खरेदी केली जाईल, अशी घोषणा ‘नाफेड’च्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे विविध कारणांनी अद्याप तूर विकू न शकलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मालाची विक्री करून मिळणाऱ्या पैशांवर खरीप हंगामातील पीक पेऱ्याची तजवीज करावी लागणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे तूर विक्री करणे सुरू केले आहे. नेमक्या याच चालून आलेल्या आयत्या संधीचा लाभ घेत व्यापाऱ्यांनी तुरीचे दर मोठ्या प्रमाणात पाडले असून, सध्या खुल्या बाजारात तुरीला केवळ ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपासच दर दिले जात आहेत. या अजब चक्रव्यूहात फसलेल्या शेतकऱ्यांना मात्र यामुळे आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.