राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत अनसिंगचा अभिषेक राऊत तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 15:57 IST2018-12-16T15:57:10+5:302018-12-16T15:57:52+5:30
अनसिंग (वाशिम): येथील जिजामाता विद्यामंदीर शाळेचा विद्यार्थी अभिषेक लक्ष्मण राऊत याने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत १७ वर्षांखालील ८० ते ८५ किलो वजन गटात तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले.

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत अनसिंगचा अभिषेक राऊत तिसरा
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम): येथील जिजामाता विद्यामंदीर शाळेचा विद्यार्थी अभिषेक लक्ष्मण राऊत याने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत १७ वर्षांखालील ८० ते ८५ किलो वजन गटात तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. याबद्दल शाळेच्यावतीने त्याचा शनिवारी सत्कार करण्यात आला.
अभिषेक राऊतने प्रशिक्षक सेन्साई बालकिसन नवगनकर (राष्ट्रीय पंच तथा ब्लॅक बेल्ट ४ डॅन, मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत सहभाग नोंदवून कांस्यपदकावर नाव कोरले. अभिषेकच्या या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला, असे मत खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये, संजय पांडे, जिजामाता विद्यामंदीरच्या प्राचार्या पाटील, सरपंच सिंधू सातव, पांडुरंग ठाकरे, विठ्ठल सातव, रामराव घोलप, बंडून कदम, इम्रान कुरेशी, राम अंकूशकर आदिंनी व्यक्त केले. अभिषेकने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल व प्रशिक्षक नवगनकर यांना दिले. दरम्यान, अभिषेकला पुढच्या वाटचालीसाठी पूर्णपणे सहकार्य करू, असे आश्वासन जिजामाता विद्यामंदीरचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी दिले.
-