शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाशिणीच्या सन्मानाचा अरक पॅटर्न

By admin | Updated: February 19, 2015 01:52 IST

लेकींचा आगळावेगळा गौरव; गावतील लेकी एवढाच जावयांचाही सन्मान.

मंगरूळपीर (जि. वाशिम) : अलीकडे स्त्री-पुरुष समानता, महिला सक्षमीकरण, स्त्री-भ्रूणहत्या यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागृती होत आहे. यातूनच अलीकडच्या काळात महिलांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृृष्टीकोनात अनेक सकारात्मक बदल होतांना दिसताहेत. पण, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील अरक गावाने या विचाराला अध्यात्म आणि भक्तीची जोड देत गावातील सासुरवाशीण झालेल्या लेकींचा आगळावेगळा गौरव केला. लेकी-बाळींच्या माहेरपणाला जपणारा अरक ग्रामवासीयांचा हा प्रयोग सासुरवाशिणीच्या सन्मानाचा अरक पॅटर्नह्णआदर्श ठरू पाहत आहे. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातलं अरक गाव.. गावाचंग्रामदैवत असलेल्या जगदेश्‍वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त १८ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसादासाठी महिलांची मोठय़ा प्रमाणात झुंबड उडाली होती. मग पंगतही बसली गर्दी तर अगदी मोठीच आणि त्यातही पंगत महिलांची..पण कुठे ना गोंधळ आणि ना कोणतीही बेशिस्त. सर्व अगदी शिस्तीत अन तेही शांततेने..पंगत वाढून झाली अनं गावातील जेष्ठ महिलांनी ताटावर बसलेल्या महिलां समोरच्या पात्राला आदरपूर्वक नमस्कार केला.. अन जेवणाला सुरुवात झाली. मंडळी, ही पंगत या गावातील लग्न होवून सासरी गेलेल्या लेकी-बाळींची..अरक हे दीड हजार लोकवस्तीचे गाव. महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी येथे मोठा सोहळा पार पडला.एरव्ही, दिवाळीला एखादेवेळी न येवू शकणारी गावातील प्रत्येक सासुरवाशीण मुलगी गावात आपल्या पती, मुला-बाळांसह आल्या होत्या. गावातील प्रत्येक मुलगी ही सार्‍या गावाची लेक या लेकीचा जगदेश्‍वर संस्थानच्यावतीने चोळीचे कापड आणि माहेरची शिदोरी देत प्रत्येकीचा सन्मान करण्यात आला. यामध्ये गावातील सर्व वयोगटातील लेकी-बाळी माहेरपणाला आलेल्या होत्या. या कार्यक्रमासाठी गावाच्या जावयांनाही आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते.गावतील लेकी इतकाच जवायांचाही सन्मान करण्यात आला. प्रत्येक जावयाचाही शाल-श्रीफळ देवून ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या गावातील जगदेश्‍वर संस्थानच्या कामाच्या माध्यमातून गावाला एकीच्या सूत्रात बांधले.