दमा, गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने संपवले जीवन
By सुनील काकडे | Updated: October 25, 2023 18:22 IST2023-10-25T18:22:16+5:302023-10-25T18:22:26+5:30
मुस्लिम कब्रस्तान जवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह आढळून आला.

दमा, गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने संपवले जीवन
सुनील काकडे, वाशिम: कित्येक वर्षांपासून असलेला दमा आणि गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने गळफास घेवून आत्महत्या केली. २४ ऑक्टोबरच्या सकाळी मुस्लिम कब्रस्ताननिकच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
या संदर्भात प्रदीप शालिकराम ढगे (नांदखेडा) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची आई इंदूबाई शालिकराम ढगे (६५) यांना दमा आणि गुडघेदुखीचा आजार जडला होता. नेहमी त्याच विवंचनेत त्या राहत होत्या. विविध ठिकाणी उपचार करूनही फायदा होत नसल्याने अखेर कंटाळून त्यांनी कब्रस्ताननजिक निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास मंगरूळपीर पोलिस करित आहे.