९०१ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:19 IST2019-11-18T15:18:35+5:302019-11-18T15:19:14+5:30
प्रविष्ठ ९२७ पैकी ९०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; तर २६ विद्यार्थी अनुपस्थित होते.

९०१ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सुशिलाताई जाधव विद्यालय, एस.एम.सी. इंग्लिश स्कुल (वाशिम) आणि जे.सी. चवरे विद्यालय (कारंजा लाड) या तीन परीक्षा केंद्रांवर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची रविवार, १७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. त्यात प्रविष्ठ ९२७ पैकी ९०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; तर २६ विद्यार्थी अनुपस्थित होते.
प्राप्त माहितीनुसार, एस.एम.सी. इंग्लिश स्कुल या केंद्रावर ३३७, जे.सी., कारंजा या केंद्रावर २५७; तर सुशिलाताई जाधव विद्यालय या केंद्रावर ३०७ विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला सामोरे गेले. कुठल्याही अनुचित प्रकाराविना परीक्षा सुरळितपणे पार पडल्याची माहिती विज्ञान पर्यवेक्षक ललीत भुरे यांनी दिली.