वाशिम जिल्ह्यात ८५ हजार ‘लाडक्या बहिणीं’नी भरले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 13:44 IST2024-07-17T13:43:44+5:302024-07-17T13:44:15+5:30
कारंजा तालुक्यात सर्वाधिक अर्ज : ‘ऑफलाईन’ला पसंती

वाशिम जिल्ह्यात ८५ हजार ‘लाडक्या बहिणीं’नी भरले अर्ज
वाशिम : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ८५ हजार ५०५ महिलांनी अर्ज भरले असून, यामध्ये कारंजा तालुक्यातील सर्वाधिक ३०५०१ अर्जांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील व अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज स्विकारले जात आहेत. १६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८५ हजार ५०५ महिलांनी अर्ज सादर केले. यामध्ये २३ हजार २८८ ऑनलाईन व ६२ हजार २१७ ऑफलाईन अर्जांचा समावेश आहे. ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहेत.
कोणत्या तालुक्यात किती अर्ज?
तालुका / अर्ज
वाशिम / २०४९८
रिसोड / ८७३६
मालेगाव / ९८०८
मं.पीर / ८५७१
कारंजा / ३०५०१
मानोरा / ७३९१