जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST2021-08-21T04:46:37+5:302021-08-21T04:46:37+5:30

वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान अर्थात पावसाळ्यात सरासरी ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस ...

84% of the annual average rainfall in the district | जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस

वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान अर्थात पावसाळ्यात सरासरी ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. गतवर्षी पावसाची टक्केवारी १०३ टक्के राहिली, तर यंदा २० ऑगस्ट पर्यंतच जिल्ह्यात ६६८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात १ जून ते २० ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ५६२.३ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. अर्थात यंदा याच कालावधीत १०२ मि.मी. पाऊस अधिक पडला आहे. जिल्ह्यात जवळपास १५ दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पाच दिवसांपासून दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती सुधारली असून, जलस्त्रोतांच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे.

----------------

कारंजात अद्यापही तूट

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला असला तरी कारंजा तालुक्यात अद्यापही अपेक्षित सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. कारंजा तालुक्यात १ जून ते २० ऑगस्ट दरम्यान ५३८.१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना ५३२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अर्थात या तालुक्यात पावसाची १ टक्का तूट आहे.

----------------------

मंगरुळपीर तालुक्यात सरासरीच्या दीडपट

जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पावसाची नोंद मंगरुळपीर तालुक्यात झाली आहे. या तालुक्यात १ जून ते २० ऑगस्ट दरम्यान ५१०.३ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना ७६८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अर्थात या तालुक्यात पावसाचे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या दीडपट झाले असून, या पावसामुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार आहे.

---------------

तालुकानिहाय पावसाचे प्रमाण

तालुका - अपेक्षित पाऊस - प्रत्यक्ष पाऊस

वाशिम - ६४५.४ - ६४६.४

रिसोड - ५५५.८ - ६३४.२

मालेगाव - ५५१.५ - ७२६.७

मंगरुळ - ५१०.३ - ७६८.६

मानोरा - ५०६.३ - ७३४.२

कारंजा - ५३८.१ - ५१०.३

----------------------------

Web Title: 84% of the annual average rainfall in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.