शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

८ कोटीतून साकारणार ग्रामपंचायतच्या ८० इमारती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 18:28 IST

वाशिम : सन २०१९-२० या वर्षात जनसुविधा विकास योजना, तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८० ग्राम पंचायतींच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने बुधवारी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१९-२० या वर्षात जनसुविधा विकास योजना, तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८० ग्राम पंचायतींच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने बुधवारी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. जवळपास ८ कोटींच्या निधीची मागणी असून, हा प्रस्ताव मंजूर झाला तर ग्राम पंचायतींचा इमारतींचा प्रश्नही निकाली निघणार आहे.गावपातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयाला स्वमालकीची जागा आणि स्वतंत्र इमारत असणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींना स्वमालकीची जागा असूनही स्वतंत्र इमारती नाहीत. त्यामुळे भाडेतत्वावरील तसेच पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसलेल्या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालये थाटण्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यातही जवळपास ९७ ग्रामपंचायतींना स्वमालकीची जागा आहे; मात्र स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे भाडेतत्वावरील इमारतीत प्रशासकीय कामकाज करण्याची वेळ कर्मचाºयांवर आली आहे. भाडेतत्वावरील इमारतीत भौतिक सुविधा नसल्यामुळे ग्रामपंचायतींच्या मासिक सभा घेणे, महत्वपूर्ण दस्ताऐवज जतन करताना संबंधितांना तारेवरची कसरत करावी लागते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्षही वेधले होते. जिल्ह्यातील सरपंच संघटनेनेदेखील ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दीपक कुमार मीना यांनी सन २०१९-२० या वर्षात जनसुविधा विकास योजना, तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेंतर्गत जवळपास ८ कोटींच्या निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे नोंदविली असून जिल्हा नियोजन समितीकडे तसा प्रस्तावही सादर  केला. या प्रस्तावावर जिल्हा नियोजन अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात यावर ग्रामपंचायतींच्या इमारतींचे भवितव्य अवलंबून आहे.

जिल्ह्यातील जवळपास ९७ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नसणे ही बाब गंभीर आहे. स्वतंत्र इमारत नसल्यामुळे ग्रामपंचायतींच्या कर्मचारी व पदाधिकाºयांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी लवकरात लवकर निधी मिळावा. निधी मिळण्यास विलंब झाल्यास सरपंच संघटनेद्वारे आंदोलन उभारले जाईल.- दीपक खडसेजिल्हाध्यक्ष, सरपंच संघटना वाशिम ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी मिळणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन अधिकारी यांनी तातडीने हा प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा.- रवी मोरे, सरपंच घोटा

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत