१00 टक्के अनुदानावर ७00 सिंचन विहिरी !
By Admin | Updated: March 13, 2017 02:11 IST2017-03-13T02:11:07+5:302017-03-13T02:11:07+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना : अर्ज सादर करण्याचे आवाहन

१00 टक्के अनुदानावर ७00 सिंचन विहिरी !
वाशिम, दि. १२-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला ७00 सिंचन विहिरींचा लक्ष्यांक प्राप्त झाला असून, अनुसूचित जातीतील पात्र लाभार्थींंंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी केले.
अनुसूचित जातीतील शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनातर्फे विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत १00 टक्के अनुदानावर विविध साहित्य व विहिरींचा लाभ दिला जातो. यापूर्वी सिंचन विहिरींसाठी लाभार्थीला केवळ एक लाख रुपये अनुदान दिले जात होते. अनुदान वाढविण्याची मागणी राज्य स्तरावर विविध घटकांकडून झाली होती. तसेच कृषी सभापती विश्वनाथ सानप व कृषी विषय समितीने विहिरीचे अनुदान तीन लाख रुपये करण्याचा ठराव पारित करून शासनाकडे सादर केला होता. आता शासनाने या योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे केले असून, विहिरींचे अनुदान अडीच लाख रुपये केले आहे. जिल्हानिहाय विहिरींचा लक्ष्यांक शासनाने जाहिर केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याला ७00 विहिरींचा लक्ष्यांक प्राप्त झाला. यासाठी कृषी विभाग व सभापती सानप यांनी विशेष पाठपुरावा केला होता. विहिरीबरोबरच मोटारपंप व स्प्रिंकलर पाईपसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये, वीजजोडणीसाठी १0 हजार रुपये अनुदान मिळणार आहे