शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षीय ‘प्यारेलाल’ यांनी जोपासला ऐतिहासिक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 11:03 IST

Washim News : गत ४० वर्षापासून हजारो विविध वस्तू एकत्र करून ते आपला छंद वेगळ्या पद्धतीने जोपासत आहेत.

वाशिम : नोकरीच्या धावपळीतून फावला वेळ काढत कारंजा शहरातील ७० वर्षीय प्यारेलाल गुप्ता यांनी पुरातनकालीन वस्तू संग्रहाचा अनोखा छंद जोपासला आहे. गत ४० वर्षापासून हजारो विविध वस्तू एकत्र करून ते आपला छंद वेगळ्या पद्धतीने जोपासत आहेत.गुप्ता यांनी एसटी महामंडळात ३० वर्ष कनिष्ठ सहायक पदावर नोकरी केली आणि सेवानिवृत्त झाले. याच दरम्यान अकोला येथे नोकरी करीत असताना त्यांना पुरातन वस्तूचा संग्रह करण्याचा छंद लागला. यामध्ये प्यारेलाल यांनी धातूच्या विविध मुर्त्या, नाणी, गृह उपयोगी वस्तू, दिवे, ढाल, अजबगजब वस्तू, पाळीव प्राण्याचे सजावट साहित्य, वजन मापे यासह अन्य पुरातन वस्तूचा समावेश आहे.

नोकरीवर असताना त्यांची एका भंगारच्या दुकानवर नजर गेली. एक सुबक धातूची मूर्ती तुटताना पाहिली आणि ती विकत घेतली. तेथून हा छंद सुरु झाला, असे ते अभिमानाने सांगतात. आज हजारो वस्तूच्या स्वरुपात हा छंद पोहचला आहे. याकरिता त्यांना अनेक वेळा उपाशी राहून वस्तू विकत आणल्या. ३० वर्षापूर्वी दोन लाख खर्च केला. लोकांसाठी काही करता येईल का आणि इतिहास जोपासल्या जाईल या प्रयत्नातून हा छंद सुरु केला, असेही प्यारेलाल सांगतात. 

कुटुंबियांचा रोषालाही जावे लागले सामोरेया छंदामुळे अनेक वेळा परिवारातील लोकांना त्रास सहन करावा लागला. काही वेळा कुटुंबियांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. मात्र परिवाराची समजूत काढून प्यारेलाल यांनी छंद सुरु ठेवला. त्या वेळी झालेला त्रास आज परिवाराच्या लोकांना वेगळा गर्व आणि आनंद देवून जात आहे. घरच्या बच्चे कंपनी आणि त्यांच्या मित्रांना हा अनमोल ठेवा पाहण्याचा वेगळा आनंद देवून जाते.

 

इतिहासप्रेमीसाठी पर्वणी ऐतिहासिक बाजार पेठ म्हणून कारंजा शहराचा उल्लेख केला जातो. आजहि अनेक पुरातन वास्तू कारंजा शहरात आहेत. मात्र जिल्ह्यात पुरातन ठेवा जोपासणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजण्याइतपतही नाहीत. प्यारेलाल यांनी जोपासलेला ठेवा हा इतिहासप्रेमीसाठी पर्वणी ठरू शकते. मात्र त्याकरिता प्यारेलाल यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. प्रशासन आणि शासन यांची मदत मिळाली तर मोठ्या संग्रहालयाची निर्मिती करणे अधिक सुलभ होइल.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा