७० वर्षीय शेतकऱ्याची जाळून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 07:36 PM2021-02-18T19:36:32+5:302021-02-18T19:36:53+5:30

Farmer suicide ७० वर्षीय शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली.

70-year-old farmer commits suicide by burning | ७० वर्षीय शेतकऱ्याची जाळून घेऊन आत्महत्या

७० वर्षीय शेतकऱ्याची जाळून घेऊन आत्महत्या

Next


शिरपूर जैन. मालेगाव तालुक्यातील एकांबा येथील निवृत्ती हरिभाऊ सोनुने या ७० वर्षीय शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली.

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एकांबा येथे निवृत्ती हरिभाऊ सोनुने व त्यांचे भाऊ मारोती सोनुने यांच्याकडे १.११ हेक्टर जमीन आहे. निवृत्ती सोनुने हे सततच्या नापिकीमुळे त्रस्त झाले होते. यातून त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात स्वतःच्या अंगावर केरोसीन टाकून जाळुन घेतले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस पाटील रमेश गवळी यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक, पोलीस शिपाई मनोज काकडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

Web Title: 70-year-old farmer commits suicide by burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.