शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी ६० हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:50 IST

Washim District News जिल्ह्यासाठी ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होऊ नये म्हणून, कृषी विभागाने आतापासूनच नियोजन केले आहे. जिल्ह्यासाठी ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला असून, पॉस मशिनवर ऑनलाईन पद्धतीनेच खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने विक्रेत्यांना दिल्या. जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात साधारणत: चार लाख हेक्टरवर पेरणी होते. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. २०२१ मधील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागातर्फे आतापासूनच केले जात असून, खताची टंचाई निर्माण होऊ नये यावर भर देण्यात आला. गतवर्षी खरीप हंगामात काही ठिकाणी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या प्रकारातील खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने जवळपास ८० हजार मे.टन खताची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली. ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला असून, गतवर्षीचा पाच हजार मे. टन खतसाठा शिल्लक आहे. येत्या खरीप हंगामात जवळपास ६५ हजार मे. टन खतसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, अशी आशा कृषी विभाग बाळगून आहे. कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खतसाठा, किमतीसंदर्भात फलक लावण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत. खतासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संपर्क साधता येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी