खरीप हंगामासाठी ६० हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 11:49 AM2021-03-08T11:49:15+5:302021-03-08T11:50:28+5:30

Washim District News जिल्ह्यासाठी ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला आहे.

60,000 metric tons of fertilizer sanctioned for kharif season! | खरीप हंगामासाठी ६० हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर!

खरीप हंगामासाठी ६० हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होऊ नये म्हणून, कृषी विभागाने आतापासूनच नियोजन केले आहे. जिल्ह्यासाठी ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला असून, पॉस मशिनवर ऑनलाईन पद्धतीनेच खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने विक्रेत्यांना दिल्या. 
जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात साधारणत: चार लाख हेक्टरवर पेरणी होते. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. २०२१ मधील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागातर्फे आतापासूनच केले जात असून, खताची टंचाई निर्माण होऊ नये यावर भर देण्यात आला. गतवर्षी खरीप हंगामात काही ठिकाणी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या प्रकारातील खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने जवळपास ८० हजार मे.टन खताची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली. ६० हजार २१० मे. टन खतसाठा मंजूर झाला असून, गतवर्षीचा पाच हजार मे. टन खतसाठा शिल्लक आहे. येत्या खरीप हंगामात जवळपास ६५ हजार मे. टन खतसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, अशी आशा कृषी विभाग बाळगून आहे. कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खतसाठा, किमतीसंदर्भात फलक लावण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत. खतासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संपर्क साधता येणार आहे.

Web Title: 60,000 metric tons of fertilizer sanctioned for kharif season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.