गळफास घेवून ५६ वर्षीय इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:24 PM2018-12-15T17:24:55+5:302018-12-15T17:25:43+5:30

रिसोड : येथील वाशिम मार्गावरील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ५६ वर्षीय इसमाने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, १५ डिसेंबर रोजी उघडकीस आली.

56-year-old man commit suicides | गळफास घेवून ५६ वर्षीय इसमाची आत्महत्या

गळफास घेवून ५६ वर्षीय इसमाची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
रिसोड : येथील वाशिम मार्गावरील एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये ५६ वर्षीय इसमाने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, १५ डिसेंबर रोजी उघडकीस आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, रिसोड येथील सिव्हील लाइन परिसरातील रहिवासी दिलिप माळणकर यांचे वाशिम मार्गावर वेल्डिंगचे वर्कशॉप आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यानंतर ते घराबाहेर पडले. उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटूंबियांनी त्यांचा शोध घेतला असता, वर्कशॉपमध्ये टिनच्या अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिलीप माळणकर यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरानी माळणकर यांना मृत घोषित केले. पोलिसानी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलिस पुढील तपास करित आहेत.

Web Title: 56-year-old man commit suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.