तीन वर्षांत मिळाले ५.४२ कोटी; आरटीई प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:59+5:302021-02-05T09:24:59+5:30

...................... ९३ जिल्ह्यात आरटीई नोंदणीकृत शाळा आरटीईअंतर्गत झालेले प्रवेश २०१७-१८ - ६०० २०१८-१९ - ७८६ २०१९-२० - ७२८ .............................. ...

5.42 crore in three years; RTE admission started | तीन वर्षांत मिळाले ५.४२ कोटी; आरटीई प्रवेश सुरू

तीन वर्षांत मिळाले ५.४२ कोटी; आरटीई प्रवेश सुरू

......................

९३

जिल्ह्यात आरटीई नोंदणीकृत शाळा

आरटीईअंतर्गत झालेले प्रवेश

२०१७-१८ - ६००

२०१८-१९ - ७८६

२०१९-२० - ७२८

..............................

२०१७-१८ या वर्षांत मिळाले ३.६ कोटी

‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मोफत प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांना २०१५-१६ आणि २०१६-१७ चा परतावा मिळाला नव्हता. त्यासाठी आंदोलने केल्यानंतर २०१७-१८ मध्ये थकीत ३ कोटी ६ लाख ३० हजार रुपयांचा परतावा अदा करण्यात आला.

..............

२०१८-१९ मध्ये मिळाले १.३५ कोटी

२०१७-१८ मधील मोफत प्रवेशापोटी शासनाकडून १.३५ कोटी रुपयांचा परतावा मिळणे अपेक्षित होते. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर शासनाकडून ही रक्कम शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली. त्यातून १ कोटी ३४ लाख ७५ हजार ३०० रुपयांचे वाटप झाले.

.............

२०१९-२० मध्ये ९१.५० लाखांचा परतावा

आधीची सर्व थकबाकी शासनाकडून अदा करण्यात आल्यानंतर २०१८-१९ मधील मोफत प्रवेशापोटी संस्थाचालकांना देय असलेली १ कोटी १ लाख ३० हजार रुपयांची रक्कमही विनाविलंब मंजूर झाली. त्यातून ९१ लाख ५० हजार ९५० रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली; तर ९ लाख रुपये अद्याप शिल्लक आहेत.

...................

शिक्षणाधिकारी कोट

शासनाकडून २०१५-१६ ते २०१९-२० या वर्षांमधील संस्थाचालकांना देय असलेला ५ कोटी ४२ लाख ६३ हजार रुपये प्राप्त झाले. त्यानुसार, ते संस्थाचालकांना वितरित करण्यात आले आहेत. यामुळे चालू शैक्षणिक सत्रात कोणीही आरटीई प्रवेश प्रक्रियेस विरोध करण्याचा प्रश्नच उरला नाही.

- अंबादास मानकर

प्राथमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

Web Title: 5.42 crore in three years; RTE admission started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.