शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात परतलेल्या ५० हजार मजुरांवर उपासमारीची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 10:55 IST

जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्य, परजिल्ह्यातून परतलेल्या तसेच होम क्वारंटीन कालावधी पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही. मजुर, कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे उपलब्ध करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केलेल्या आहेत. कामे प्रस्तावित करण्यातच प्रशासनाचा अधिकाधिक वेळ खर्ची पडत असल्याने तुर्तास या मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे.जिल्ह्यात रोजगाराची फारशी साधने उपलब्ध नसल्याने अनेकजण महानगर तसेच परराज्यात रोजगाराच्या शोधात जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. यामुळे कंपन्या, उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांचे रोजगार गेले. ३१ मे पर्यंत जिल्ह्यात जवळपास ७० हजार मजूर, कामगार परतले आहेत. यापैकी ५० हजार नागरिकांचा ‘होम क्वारंटीन’ कालावधी संपुष्टात आला. दरम्यान, परजिल्हा, परराज्यातून परतलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दिल्या होत्या. कामे प्रस्तावित करण्यातच प्रशासनाचा अधिकाधिक वेळ खर्ची पडत असल्याने तुर्तास या मजुर, कामगारांना रोजगारासाठी कामे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मजुरांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला.जिल्ह्यात रोहयो अंतर्गतची ९१५० कामे विविध कारणांमुळे बंद पडलेली आहेत. नव्याने ४१०० कामे प्रस्तावित केली जाणार आहेत. सध्या विविध कामांवर ३३०० मजूर काम करीत आहेत. जिल्ह्यात परतलेल्या मजुर, कामगारांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तात्पुरत्या स्वरुपात कामे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मजूरवर्गातून होत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत मजूर, कामगारांना कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सध्या विविध कामांवर ३३०० मजूर काम करीत आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी,

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार