वाशिम जिल्ह्यात परतलेल्या ५० हजार मजुरांवर उपासमारीची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:54 AM2020-06-02T10:54:57+5:302020-06-02T10:55:05+5:30

जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही.

50,000 returning workers in Washim district has no work | वाशिम जिल्ह्यात परतलेल्या ५० हजार मजुरांवर उपासमारीची वेळ!

वाशिम जिल्ह्यात परतलेल्या ५० हजार मजुरांवर उपासमारीची वेळ!

Next

- संतोष वानखडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्य, परजिल्ह्यातून परतलेल्या तसेच होम क्वारंटीन कालावधी पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही. मजुर, कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे उपलब्ध करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केलेल्या आहेत. कामे प्रस्तावित करण्यातच प्रशासनाचा अधिकाधिक वेळ खर्ची पडत असल्याने तुर्तास या मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
जिल्ह्यात रोजगाराची फारशी साधने उपलब्ध नसल्याने अनेकजण महानगर तसेच परराज्यात रोजगाराच्या शोधात जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. यामुळे कंपन्या, उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांचे रोजगार गेले. ३१ मे पर्यंत जिल्ह्यात जवळपास ७० हजार मजूर, कामगार परतले आहेत. यापैकी ५० हजार नागरिकांचा ‘होम क्वारंटीन’ कालावधी संपुष्टात आला. दरम्यान, परजिल्हा, परराज्यातून परतलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दिल्या होत्या. कामे प्रस्तावित करण्यातच प्रशासनाचा अधिकाधिक वेळ खर्ची पडत असल्याने तुर्तास या मजुर, कामगारांना रोजगारासाठी कामे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मजुरांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला.
जिल्ह्यात रोहयो अंतर्गतची ९१५० कामे विविध कारणांमुळे बंद पडलेली आहेत. नव्याने ४१०० कामे प्रस्तावित केली जाणार आहेत. सध्या विविध कामांवर ३३०० मजूर काम करीत आहेत. जिल्ह्यात परतलेल्या मजुर, कामगारांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तात्पुरत्या स्वरुपात कामे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मजूरवर्गातून होत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत मजूर, कामगारांना कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सध्या विविध कामांवर ३३०० मजूर काम करीत आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी,

Web Title: 50,000 returning workers in Washim district has no work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.