शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीबाबतचे ५० हजार अर्ज मुख्यमंत्र्यांना पाठविणार!

By admin | Updated: June 1, 2017 01:12 IST

रिसोड : पीककर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेनेच्यावतीने ‘मी कर्जमुक्त होणार’ अभियान राबविल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : पीककर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेनेच्यावतीने ‘मी कर्जमुक्त होणार’ अभियान राबविल्या जात आहे. या अभियानांतर्गत रिसोड-मालेगाव मतदारसंघातून किमान ५० हजार शेतकऱ्यांचे पीककर्जमाफीचे अर्ज मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी बुधवारी दिली.गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना निसर्गाची साथ मिळाली नाही. सततची नापिकी अणि शेतमालाला अत्यल्प बाजारभाव यामुळे शेतकरी वेळेच्या आत कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. परिणामी, शेतकरी कर्जबाजारी झाले. शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी कर्जमाफी आवश्यक आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे प्रभावीपणे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे ‘मी कर्जमुक्त होणार’ अभियान राज्यभर राबविले जात आहे. वाशिम जिल्ह्यातही सदर अभियान राबविले जात असून, रिसोड व मालेगाव मतदारसंघात अधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन अर्ज भरून घेतले जात आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूळकर, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, सेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात जवळपास ५० हजार शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीबाबतचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. आतापर्यंत १० हजारावर अर्ज भरून घेतले आहेत. या अर्जामध्ये शेतकऱ्यांचे नाव, थकित कर्ज यासह अन्य माहिती भरून घेतली जात असल्याचे सानप यांनी सांगितले.