गृह विलगीकरणात ५०० रुग्ण; घरावर झळकतोय  ‘पॉझिटिव्ह’चा फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:17 AM2021-02-25T11:17:45+5:302021-02-25T11:17:57+5:30

CoronaVirus News संबंधित रुग्णाच्या घरावर लहान आकारातील ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह’ असा फलक (बोर्ड) लावण्यात येत आहे.

500 patients in home aisolation in Washim District | गृह विलगीकरणात ५०० रुग्ण; घरावर झळकतोय  ‘पॉझिटिव्ह’चा फलक!

गृह विलगीकरणात ५०० रुग्ण; घरावर झळकतोय  ‘पॉझिटिव्ह’चा फलक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना पॉझिटिव्ह; परंतु, सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास नसलेल्या जवळपास ५०० रुग्णांनी गृह विलगीकरणाला पसंती दिली आहे. दरम्यान, पूर्वीप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर न करता आता संबंधित रुग्णाच्या घरावर लहान आकारातील ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह’ असा फलक (बोर्ड) लावण्यात येत आहे.
अलीकडच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांवर आरोग्य विभागाने १४ दिवस वॉच ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिलेल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह; परंतु सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या तसेच घरातच स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था असलेल्या आणि स्वत:साठी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करणाऱ्या रुग्णांना ‘गृह विलगीकरणा’चा पर्याय जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. सध्या ५०० रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या घरावर लहान आकारातील ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह’ असा फलक (बोर्ड) लावण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
 
जिल्ह्यात केवळ दोन खासगी कोविड रुग्णालय
जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय याबरोबरच रिसोड, वाशिम, कारंजा व मंगरूळपीर येथे सरकारी कोविड केअर रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय दोन खासगी कोविड रुग्णालय आहे. यापूर्वी पाच खासगी कोविड रुग्णालयाची सुविधा उपलब्ध होती.


अनेक कोरोनाबाधित रुग्णांना सौम्य लक्षणे, कोणताही त्रास जाणवत नाही. आवश्यक त्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या जवळपास ५०० रुग्णांनी गृृह विलगीकरणाचा पर्याय निवडला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेण्यात येतो.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: 500 patients in home aisolation in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.