बालकावर उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून ५० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:03 IST2018-06-01T15:03:19+5:302018-06-01T15:03:19+5:30
शिरपूर जैन: जमिनीवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५ वर्षीय मुलाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजारांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

बालकावर उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून ५० हजारांची मदत
शिरपूर जैन: जमिनीवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५ वर्षीय मुलाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजारांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. या मदतीचा धनादेश आमदार अमित झनक यांच्या हस्ते दुखापतग्रस्त बालकाचे पिता सतिष सारडा यांना १ जून रोजी प्रदान करण्यात आला.
शिरपूर येथील सतिष दामोदर सारडा यांचा ५ वर्षीय मुलगा जमिनीवर पडल्याने त्याच्या मेंदला जबर इजा झाली असून, त्याच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. त्याला उपचार करण्यास आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आमदारांमार्फत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. आता सतिष सारडा यांच्या ५ वर्षीय मुलावर उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. या मदतीचा धनादेश आमदार अमित झनक यांच्या हस्ते शुक्रवार १ जून रोजी सतिष सारडा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी सभापती संजय शर्मा, दामोदर सारडा, सलिम रेघीवाले, अमित वाघमारे, गोपाल जाधव, संतोष बाविस्कर, सचिन सारडा, कार्तिक कोरडे, विनोद आंबेकर आदि उपस्थित होते.