जिल्ह्यात आणखी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:35+5:302021-07-31T04:41:35+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय कमी ...

जिल्ह्यात आणखी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय कमी असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी नव्याने ५ रुग्ण आढळून आले, तर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. रिसाेड व मालेगाव तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित चार तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६५८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०९८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३६ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
.........
३३ रुग्ण ॲक्टिव्ह
शुक्रवारच्या अहवालानुसार वाशिम, मानोरा, मंगरुळपीर व कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. गुरुवारीदेखील ४ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला नव्हता. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३३ रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.