शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सायकलींचा ४९ लाखांचा निधी पंचायत समित्यांना वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 2:58 PM

४९.९१ लाखांचा निधी मंजूर असून तो जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानव विकास मिशन अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील पात्र १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करून देण्यासाठी प्रती विद्यार्थीनी साडेतीन हजार याप्रमाणे ४९.९१ लाखांचा निधी मंजूर असून तो जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून सलग पाठपुरावा केला होता, हे विशेष.मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत; मात्र काही उपक्रम, योजनांना प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत आहे. मानव विकास मिशनअंतर्गतची मोफत सायकल योजनाही प्रशासकीय दिरंगाईत अडकली होती. मानव विकास मिशनमध्ये समाविष्ट चार तालुक्यांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाºया तथा शाळेपासून पाच किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्यास असणाºया विद्याथीर्नीनींना सायकल खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या खात्यात १४२६ सायकलींसाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी वळता करण्यात आला होता; परंतु २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र संपूनही त्याचे पंचायत समिती स्तरावर वाटप झाले नव्हते.यासंबंधी ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून हा विषय उजागर केला. अखेर त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून २०१९-२० चे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर सायकलींसाठी प्राप्त झालेला निधी पंचायत समितीनिहाय वाटप करण्यात आला. पंचायत समित्यांनी पुढची कार्यवाही म्हणून संबंधित शाळांना पात्र विद्यार्थीनींची यादी मागितली असून त्यानुसार रकमेचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करण्यासाठी साडेतीन हजार रुपये याप्रमाणे ४९.९१ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. तो पंचायत समित्यांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबंधित शाळांमधील पात्र विद्यार्थीनींना तो मुख्याध्यापकांमार्फत दिला जाणार असून संबंधित शाळांमध्ये पालकांनी संपर्क साधावा.- टी.एन. नरळेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिममालेगाव तालुक्यातील १५ शाळांमधील ३६० विद्यार्थीनींना सायकल खरेदी करण्यासाठी मिळालेला निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करण्यात आला असून पात्र मुलींच्या खात्यात तो वळता करण्याच्या सूचना देण्यात आल्या.- राजेंद्र शिंदेगटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मालेगाव

 

टॅग्स :washimवाशिमpanchayat samitiपंचायत समिती