शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'प्रोत्साहन' अनुदानासाठी ४८५८ शेतकरी अपात्र; आतापर्यंत २१८७० शेतकऱ्यांना मिळाला लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 13:30 IST

योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासांठीही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. तथापि, योजनेसाठी पात्र नसतानाही अर्ज केलेले ४ हजार ८५८ शेतकरी अपात्र ठरले आहेत तर सात हजारांवर शेतकरी होल्डवर आहेत.

योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासांठीही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातून ३४ हजार १४१ शेतकऱ्यांची खाते पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी २२ हजार ३८४ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्याने त्यांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला. त्यातील आतापर्यंत २१ हजार ८७० शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी २२ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला नसल्याने ते अपात्र आहेत की, पात्र असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये होता. त्यामुळे सहकार आयुक्तांनी अपात्र आणि होल्डवर असलेल्या शेतकऱ्यांची यादी कारणांसह जिल्हा सहकार विभागाला नुकतीच पाठविली आहे. त्यामध्ये २ हजार २६९ शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना अपात्र करण्यात आले. सहकारी संस्थांचे पदाधिकारी १, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी ६, आयकर भरणा करणारे १ हजार ८१८ आणि शासकीय सेवेत असलेले ७१४ शेतकरी असून एकूण ४ हजार ८५८ शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्याशिवाय निकषांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असून ते खातेही होल्डवर ठेवण्यात आले आहेत. त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नसल्याची चिन्हे आहेत.पात्र शेतकऱ्यांना ९०.२२ कोटी वाटपजिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी केवासयी केल्यानंतर शासनस्तरावरून थेट बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. जिल्ह्यातील २१ हजार ८७० शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी २२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. केवायसी केलेले केवळ ३३६ शेतकऱ्यांना अनुदान देणे शिल्लक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी