वाशिम जिल्ह्यात ४८१ जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 13:00 IST2020-12-26T12:57:56+5:302020-12-26T13:00:06+5:30

Snake Bite News ४८१ जणांना सर्पदंश झाला असून, यामध्ये दाेन जणांचा मृत्यू झाला आहे.

484 people were bitten by snakes in Washim district | वाशिम जिल्ह्यात ४८१ जणांना सर्पदंश

वाशिम जिल्ह्यात ४८१ जणांना सर्पदंश

ठळक मुद्देजिल्ह्यात २०१९ मध्ये ४८४ जणांना सर्पदंश झाला हाेता.२०२० मध्ये नाेव्हेंबर महिन्यापर्यंत ४८१ जणांना सर्पदंश झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : जिल्ह्यात चालू वर्षामध्ये ४८१ जणांना सर्पदंश झाला असून, यामध्ये दाेन जणांचा मृत्यू झाला आहे. वाशिम व कारंजा तालुक्यामध्ये सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडल्या असून दाेन मृतकापैकी प्रत्येक एक वाशिम व रिसाेड तालुक्यातील रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात २०१९ मध्ये ४८४ जणांना सर्पदंश झाला हाेता, तर २०२० मध्ये नाेव्हेंबर महिन्यापर्यंत ४८१ जणांना सर्पदंश झाला असून यामध्ये दाेघांचा मृत्यू झाला आहे. 
यामध्ये वाशिम तालुक्यामध्ये २७४, कारंजा तालुक्यात ९१, रिसाेड तालुक्यात ५७, मालेगाव तालुक्यात ११, मंगरुळपीर तालुक्यात ३२ तर मानाेरा तालुक्यातील १६ इसमांचा समावेश आहे. सर्पदंश झालेल्या जिल्ह्यातील २५ व्यक्तींवर उपचार करण्यात आले असून ६१ जणांना रेफर करण्यात आले आहे. ३९५ सर्पदंश व उपचार, रेफर करणारे एकूण रुग्ण ४८१ आहेत. जिल्ह्यात लसीचा साठा माेठ्या प्रमाणात उपलब्ध आहे .
साप चावताच याप्रकारे घ्यावी काळजी
सर्पदंश झाल्याबराेबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णाने धीर धरणे, अनेकवेळा भीतीनेच रुग्ण दगावतात. सर्पदंश झाला असेल त्या ठिकाणापासून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी. यामुळे विष शरीरात पसरण्यापासून राेखले जाते. सर्पदंश झालेल्या ठिकाणी ब्लेड किंवा धारदार शस्त्राने चिरा मारावा यामुळे रक्तासाेबत विषही बाहेर येते. हे प्राथमिक उपचार असून यानंतर औषधाेपचार आवश्यक असल्याचे सर्पमित्र गाैरवकुमार इंगळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात लसींचा मुबलक साठा 
जिल्ह्यात सर्पदंश झाल्यानंतर लागणाऱ्या लसींचा साठा आराेग्य विभागाकडे माेठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. लसीमुळे सर्पदंश झाला अशी एकही घटना जिल्ह्यात घडली नाही.

जिल्ह्यात आढळणारे साप 
सापांचे विषारी व बिनविषारी प्रकार आहेत. यामध्ये जिल्ह्यात विषारी सापांमध्ये मन्यार, घाेणस, फुरसे व नाग हे साप माेठया प्रमाणात आढळून येतात. हे जहाल विषारी साप असल्याचे सर्पमित्रांकडून सांगण्यात आले. तसेच बिनविषारी सापांमध्ये दहा प्रकारचे साप जिल्ह्यात आढळून येतात. यामध्ये काही महत्त्वाचे म्हणे धामण, गवत्या, डुरक्या, घाेणस, धुळनागिण, रॅट स्नेकचा समावेश् आहे.


तालुकानिहाय घटना
    २०१९    २०२०
वाशिम    २३४    २७४
कारंजा    १८१    ९१
रिसाेड    ३४    ५७
मालेगाव    ७    ११
मंगरुळ    २२    ३२
मानाेरा    ६    १६

जिल्हयात चालू वर्षात ४८१ जणांना सर्पदंश झाला असून यामध्ये दाेघांचा मृत्यू आहे.

Web Title: 484 people were bitten by snakes in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.