बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून ४६ हजाराने गंडविले

By Admin | Updated: June 25, 2014 01:40 IST2014-06-25T01:31:13+5:302014-06-25T01:40:11+5:30

वाशिम येथील ग्राहकाला बँकेचाअधिकारी बोलत असल्याची बातवणी करून गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला.

46 thousand people shouted as being bank officer | बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून ४६ हजाराने गंडविले

बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून ४६ हजाराने गंडविले

वाशिम : दिल्लीहून स्टेट बँकेचा अधिकारी बोलत असल्याची बातवणी करून एका ग्राहकाला ४६ हजार ३0९ रूपये ट्रान्सफर करून गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध आज २४ जून रोजी भादंविचे कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार, शहरातील मानमोठे नगर येथील रहिवासी प्रभाकर लुथर मानमोठे यांच्या भ्रमणध्वनीवर १0 जून रोजी एका अज्ञात इसमाचा कॉल आला. त्याने मी स्टेट बँकेचा अधिकारी बोलत आहो. तुम्हाला आमच्या बँकेकडून क्रेडीट कार्ड प्राप्त झाले का, असे म्हटले. त्यानंतर प्राप्त झालेल्या क्रेडीट कार्डचे ह्यव्हेरीफिकेशनह्ण करण्यासाठी कार्ड क्रमांक व पिन क्रमांक सांगा, असे म्हटले. ग्राहक मानमोठे यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन आपला कार्ड क्रमांक व पिन क्रमांक त्या तोतया अधिकार्‍याला दिला. लगेच त्याच्या खात्यामधून ४६ हजार ३0९ रूपये ट्रान्सफर झाले. मानमोठे यांनी बँकेमध्ये जाऊन चौकशी केली असता संबंधित अधिकार्‍यांनी आमच्या कुठल्याही अधिकार्‍यांचे असे फोन कॉल्स येत नसतात. तुमची कुणीतरी फसवणूक केली आहे. त्यावेळी मानमोठे यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.
मानमोठे यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरूद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीहून पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंविचे कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: 46 thousand people shouted as being bank officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.