४५ हजारांचे सोने लंपास
By Admin | Updated: May 29, 2015 02:32 IST2015-05-29T02:32:00+5:302015-05-29T02:32:00+5:30
वाशिम येथील बालाजी कॉम्प्लेक्समधील घटना; आरोपी अज्ञात.
_ns.jpg)
४५ हजारांचे सोने लंपास
वाशिम : एका फायनान्स कंपनीमधून गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वस्तू सोडवून घरी परत जाताना एका भामट्याने ५५ वर्षीय इसमाजवळून हातसफाई करून ४५ हजारांचे सोने लंपास केले. ही घटना बालाजी कॉम्प्लेक्स परिसरात २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. मंगरूळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील ५५ वर्षीय मुरलीधर बन्शीराम भोयर यांनी व्यक्तिगत कामासाठी वाशिम येथील एका फायनान्स कंपनीमध्ये १५ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते. पैशाची जुळवाजुळव झाल्यानंतर त्यांनी २८ मे रोजी पैशाचा भरणा करून गहाण ठेवलेली सोन्याचे दागिने सोडवून घेतले. सोन्याचे दागिने ठेवलेली छोटी पिशवी नवीन खरेदी केलेल्या मोबाईल बॉक्समध्ये ठेवली. यावेळी भोयर बालाजी कॉम्प्लेक्समध्ये फिरत असताना अनोळखी इसम भेटला. त्याने भोयर यांना मलाही नवीन मोबाईल घ्यायचा आहे. तुम्ही घेतलेला मोबाईल दाखवा, असे म्हणताच भोयर यांनी मोबाईलचा बॉक्स समोरील अनोळखी इसमाच्या हाती दिला. अज्ञात चोरट्याटने बॉक्समधील सोन्याच्या वस्तू काढून घेऊन बॉक्स भोयर यांच्या हाती सोपवला. काही वेळानंतर भोयर यांनी बॉक्स उघडून बघितला असता त्यामध्ये त्यांना सोन्याच्या वस्तू आढळून आल्या नाही. वृत्त लिहेस्तोवर या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली नव्हती.