वाशिम जिल्ह्यात आणखी ४ पॉझिटिव्ह; ६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:43 PM2021-07-25T17:43:07+5:302021-07-25T17:43:18+5:30

4 more positives in Washim district : २५ जुलै रोजी ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ६ जणांनी कोरोनावर मात केली.

4 more positives in Washim district; 6 corona free | वाशिम जिल्ह्यात आणखी ४ पॉझिटिव्ह; ६ कोरोनामुक्त

वाशिम जिल्ह्यात आणखी ४ पॉझिटिव्ह; ६ कोरोनामुक्त

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून रविवार, २५ जुलै रोजी ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ६ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,६४१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी नव्याने ४ रुग्ण आढळून आले तर ६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिसोड व मालेगाव तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरीत चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६४१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०९६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
 
चार तालुके निरंक
रविवारच्या अहवालानुसार वाशिम, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात तसेच मालेगाव व रिसोड शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. रविवारी जिल्ह्यातील एकाही प्रमुख शहरात कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
 
५३ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने ४ रुग्ण आढळून आले तर ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ५३ रुग्ण सक्रिय आहेत.

Web Title: 4 more positives in Washim district; 6 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.