विद्युत उपकेंद्रातून ३६ हजारांच्या विद्युत ऑईलची चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:45 IST2017-11-23T01:45:30+5:302017-11-23T01:45:46+5:30
रिसोड: हराळ शिवारातील विद्युत उपकेंद्रातील रोहित्राची तोडफोड करून त्यातील ४00 लिटर (किंमत ३६ हजार रुपये) ऑईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २0 नोव्हेंबरच्या रात्री घडली.

विद्युत उपकेंद्रातून ३६ हजारांच्या विद्युत ऑईलची चोरी!
ठळक मुद्देरिसोड: हराळ शिवारातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: हराळ शिवारातील विद्युत उपकेंद्रातील रोहित्राची तोडफोड करून त्यातील ४00 लिटर (किंमत ३६ हजार रुपये) ऑईल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २0 नोव्हेंबरच्या रात्री घडली.
यासंदर्भात विद्युत वितरणचे सहायक अभियंता विस्मीत हेडाऊ यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.