३.५८ लाख जणांना मिळाली शिवभोजन थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST2021-08-26T04:44:05+5:302021-08-26T04:44:05+5:30

राज्यातील कोरोना काळात गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली. राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजने ...

3.58 lakh people got Shiva food plate | ३.५८ लाख जणांना मिळाली शिवभोजन थाळी

३.५८ लाख जणांना मिळाली शिवभोजन थाळी

राज्यातील कोरोना काळात गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली. राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजने अंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने जिल्ह्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

जिल्हयात शिवभोजन थाळीचे २७ केंद्र सुरु आहे. प्रतिदिवस २७६० थाळ्याचे गोरगरीब तसेच गरजूंना वितरण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. शासनाने १५ एप्रिल २०२१ पासून शिव भोजन थाळी वितरणात दीडपट वाढ केली आहे. त्यानुसार भोजन थाळीचा प्रतिदिन इष्टांक ४ हजार १२५ इतका आहे. तसेच १५ एप्रिल २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत जिल्हयातील ३ लाख ५८ हजार ५८२ गोरगरीब व गरजूंना शिवभोजन थाळीचा नि:शुल्क लाभ देण्यात आला आहे.

००००

शिवभोजन थाळीचे केंद्र २७

प्रतिदिन उद्दिष्ट : ४१२५

१५ एप्रिल ते २३ ऑगस्ट या कालावधीत लाभ घेतला : ३५८५८२

०००

जिल्ह्यात शिवभोजन थाळीचे २७ केंद्र असून, या माध्यमातून गरजूंना शिवभोजन थाळीचा मोफत लाभ देण्यात येत आहे.

- सुनील विंचनकर

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम

Web Title: 3.58 lakh people got Shiva food plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.