३५ वर्षीय युवकाची गळफास घेवुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:37 IST2017-10-22T22:37:01+5:302017-10-22T22:37:28+5:30
मंगरुळपीर : शहरातील सुभाष चौक येथील रहिवासी असलेल्या शाम अशोक अग्रवाल या युवकाने २२ आॅक्टोंबरचे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

३५ वर्षीय युवकाची गळफास घेवुन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : शहरातील सुभाष चौक येथील रहिवासी असलेल्या शाम अशोक अग्रवाल या युवकाने २२ आॅक्टोंबरचे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
फिर्यादी अशोक अमरचंद अग्रवाल रा.सुभाष चौक मंगरुळपीर यांनी पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचा मुलगा श्याम अग्रवाल वय ३५ वर्षे हा जनरल स्टोअर्स चा व्यवसाय करीत होता. त्याने राहत्या घरातील टिनाच्या अँगलला २२ चे सकाळी ११ वाजताचे दरम्यान गळफास घेवुन आत्महत्या केली. अशा फिर्यादीवरुन मंगरुळपीर पोलिसांनी कलम १७४ नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पि.एस.आय.पंडीत करीत आहे.