उपाहारगृहे फोडून ३५ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:34 IST2017-08-27T19:33:36+5:302017-08-27T19:34:04+5:30

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा शिवारात औरंगाबाद-नागपूर महामार्गावर काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानच्या समोर असलेल्या दोन उपाहारगृहांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवार २६ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

35 thousand rupees for lunch break | उपाहारगृहे फोडून ३५ हजारांचा ऐवज लंपास

उपाहारगृहे फोडून ३५ हजारांचा ऐवज लंपास

ठळक मुद्देकाळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानच्या समोरील दोन उपहारगृहे चोरट्यांनी फोडलीअज्ञात चोरट्यांविरोधात मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हीराजा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा शिवारात औरंगाबाद-नागपूर महामार्गावर काळामाथा येथील अवलिया महाराज संस्थानच्या समोर असलेल्या दोन उपाहारगृहांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवार २६ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी उपाहारगृहाचे मालक गणेश राठोड आणि सिद्धूआप्पा परांडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मालेगाव पोलिसांनी रविवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. 

Web Title: 35 thousand rupees for lunch break