35 thousand farmers in Washim district updated their Aadhar Cards | वाशिम जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार दुरुस्ती
वाशिम जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गंत आधार क्रमांकात त्रूटी असलेल्या ९५ हजार शेतकºयांपैकी जवळपास ३६ हजार शेतकºयांनी ९ डिसेंबरपर्यंत पीएम किसान संकेतस्थळावर अँड्रॉईड मोबाईलच्या  माध्यमातून दुरूस्ती केली आहे. आधार क्रमांकात दुरूस्ती करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर असून, शेतकऱ्यांनी तातडीने दुरूस्ती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमिन असलेल्या शेतकºयांना तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे सहा हजर रुपयांची मदत केली जाणार आहे. या योजनेंतर्गत जिल्हयातील १ लाख ४७ हजार १०० शेतकरी कुटूंबाचा डाटा लाभार्थी म्हणून पाठविण्यात आला आहे. यापैकी ९७ हजार ५७१ लाभार्थ्यांच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी आढळून आलेल्या आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) यांच्याकडे आधार कार्ड व बँॅकेच्या पासबुकची छायांकित प्रत देणे अपेक्षित आहे. आधार कार्ड संबधित त्रुटीच्या दुरुस्ती नजिकच्या सीएससी केंद्रातून केल्या जाऊ शकतात. याशिवाय स्वत: लाभाथ्यार्ना कोणत्याही अ‍ॅन्ड्राइड मोबाईल संचावरुनही आधार संबंधित दुरुस्ती करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी ह्यपीएम किसान डॉट गव्ह. डॉट ईनह्ण या संकेतस्थळावर जावून होम स्क्रीनवरील हिरव्या पट्टीमधील डावीकडून क्रंमाक आठवर ह्यफार्मर्स कॉर्नरह्णची सुविधा देण्यात आली आहे. या आॅप्शनचा वापर करून शेतकºयांना आपल्या आधारकार्डमधील दुरुस्ती करता येते. जिल्ह्यात ९ डिसेंबरपर्यंत ९५ हजार शेतकºयांपैकी ३६ हजार शेतकºयांनी दुरूस्ती केल्याने या शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यातील अडथळा दूर झाला आहे. ह्यपीएम किसान डॉट गव्ह. डॉट ईनह्ण या संकेतस्थळावर  शेतकºयांना स्वत:च आधार दुरुस्ती करण्यासाठी १० डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याने उर्वरीत शेतकºयांनी तातडीने आधार क्रमांकातील त्रूटीची पुर्तता करून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.ंं

Web Title: 35 thousand farmers in Washim district updated their Aadhar Cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.