प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या सानिध्यात साजरा झाला काटेपुर्णा अभयारण्याचा ३३ वा स्थापना दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST2021-02-10T04:39:58+5:302021-02-10T04:39:58+5:30

अभ्यास दौऱ्यात शिवाजी महाविद्यालय, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, आरएलटी सायन्स कॉलेज अकोला, गुलामनबी आजाद महाविद्यालय बार्शिटाकळी, महात्मा फुले महाविद्यालय पातूर, ...

The 33rd foundation day of Katepurna Sanctuary was celebrated in the company of professors and students | प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या सानिध्यात साजरा झाला काटेपुर्णा अभयारण्याचा ३३ वा स्थापना दिवस

प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या सानिध्यात साजरा झाला काटेपुर्णा अभयारण्याचा ३३ वा स्थापना दिवस

अभ्यास दौऱ्यात शिवाजी महाविद्यालय, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, आरएलटी सायन्स कॉलेज अकोला, गुलामनबी आजाद महाविद्यालय बार्शिटाकळी, महात्मा फुले महाविद्यालय पातूर, स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालय शिरपूर (जैन) येथील २० प्राध्यापक व प्राध्यापिका सहभागी झाले होते. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे उपजीविका तज्ज्ञ प्रफुल्ल सावरकर यांनी मेळघाटातील विविध उपक्रमाची माहिती दिली. निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी काटेपूर्णा अभयारण्याची व डॉ. मिलिंद शिरभाते यांनी अभयारण्यातील संशोधनाच्या विविध संधी याबद्दल स्लाईड शोद्वारे माहिती दिली. प्राध्यापकांना काटेपूर्णातील सफारी घडवून आणण्यात आली. अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी अध्यक्षीय भाषणात, प्राध्यापकांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना काटेपूर्णातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी व संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, तसेच जैवविविधतचे संरक्षण व संवर्धनासाठी स्वत:सुद्धा संशोधन करावे, असे आवाहन केले.

सूत्रसंचालन अमोल सावंत यांनी तर आभार प्रदर्शन वनपरिश्रेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी केले. यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. हेमंत सपकाळ, तुषार देशमुख, डॉ. उज्ज्वला लांडे, डॉ. शुभांगी गावंडे, डॉ. अनुराधा राजोरिया, महात्मा फुले महाविद्यालय पातूर येथील डॉ. अमृता शिरभाते, प्रा. रोशनी लोमटे, रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. सुशील नगराळे, डॉ. सुधीर कोहचाडे, डॉ. हरीश मालपाणी, डॉ. शैलेंद्र मडावी, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या डॉ. प्रिया धाबे, डॉ. निशा वराडे, जी. एन. ए. महाविद्यालय बार्शीटाकळी येथील डॉ. संतोष सुरडकर, डॉ. विनोद उंडाळ, पुंडलिकराव गवळी महाविद्यालयाचे डॉ . सीमित रोकडे, वतसगुल्म जैवविविधता संस्थेचे पुरुषोत्तम इंगळे व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: The 33rd foundation day of Katepurna Sanctuary was celebrated in the company of professors and students