३३ जणांची कोरोनावर मात; १२ पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST2021-07-05T04:25:29+5:302021-07-05T04:25:29+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

33 defeated Corona; 12 Positive! | ३३ जणांची कोरोनावर मात; १२ पॉझिटिव्ह !

३३ जणांची कोरोनावर मात; १२ पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी नव्याने १२ रुग्ण आढळून आले तर, ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिसोड व कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात ३, मंगरुळपीर तालुक्यात ४, मालेगाव तालुक्यात ३, मानोरा तालुक्यात २ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,४७८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,७१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर, आतापर्यंंत ६२० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली आहे.

००००

१४० सक्रिय रुग्ण

रविवारच्या अहवालानुसार नव्याने १२ रुग्ण आढळून आले तर, ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १४० रुग्ण सक्रिय आहेत.

000000000000

रिसोड, कारंजा निरंक

रविवारच्या अहवालानुसार रिसोड व कारंजा तालुक्यात तसेच वाशिम शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिमच्या ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले. मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण, मंगरुळपीरच्या ग्रामीण भागात दोन रुग्ण, मानोरा शहरात दोन रुग्ण आढळून आले.

Web Title: 33 defeated Corona; 12 Positive!