शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशी ३१ अर्ज दाखल!

By admin | Updated: October 28, 2016 02:23 IST

वाशिम न. प. निवडणूक; अध्यक्षपदासाठी सहा अर्ज.

वाशिम, दि. २७- जिल्हय़ातील तीन नगर परिषद निवडणुकीत चौथ्या दिवशी एकूण ३१ अर्ज दाखल झाले. यामध्ये वाशिम येथे आठ, मंगरुळपीर येथे १२ आणि कारंजा येथील ११ अर्जांंचा समावेश आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीसाठी २४ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. तिसर्‍या दिवसापर्यंंत वाशिम येथे दोन, कारंजा दोन तर मंगरुळपीर येथे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. येत्या २७ नोव्हेंबर रोजी वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. वाशिम येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अशोक हेडा यांनी गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. उर्वरित पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नाही. वाशिम, कारंजा व मंगरुळपीर या तीनही नगर परिषदेतील सत्ता ताब्यात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. वाशिम नगर परिषदेसाठी चवथ्या दिवशी सदस्य पदासाठी सात तर अध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाला. मंगरुळपीर येथे सदस्य पदासाठी नऊ आणि अध्यक्ष पदासाठी तीन अर्ज दाखल झाले. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे बानो रहीम चौधरी व कमीज आसिया मिर्झा उबेद बेग, राष्ट्रवादीतर्फे खा मयजबीन सईन खा यांनी अर्ज दाखल केले.कारंजा नगर परिषदेत सदस्य पदासाठी नऊ आणि अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले. यामध्ये अध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे दिलीप भोजराज तर अपक्ष म्हणून किशोर देवळे यांनी अर्ज भरला.