भर जहागीर येथे आणखी ३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:08 IST2021-05-05T05:08:33+5:302021-05-05T05:08:33+5:30

००० कागदपत्रांमध्ये त्रुटी, कामे प्रलंबित वाशिम : काही लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वाशिम तालुक्यातील जवळपास ६० घरकुलांची कामे ...

3 more patients at Bhar Jahagir | भर जहागीर येथे आणखी ३ रुग्ण

भर जहागीर येथे आणखी ३ रुग्ण

०००

कागदपत्रांमध्ये त्रुटी, कामे प्रलंबित

वाशिम : काही लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वाशिम तालुक्यातील जवळपास ६० घरकुलांची कामे प्रलंबित राहिली आहेत. ही कामे विनाविलंब पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.

0000000000000000

अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्याची मागणी

वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून संबंधित यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश द्यावे व अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

000000000000000

शौचालयांसाठी रेती देण्याची मागणी

वाशिम : जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र रेतीच उपलब्ध नसल्याने ही कामे प्रभावित होत आहेत. रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

०००

२५ वाहनांवर कारवाई

वाशिम : रिसोड, मालेगाव शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रकार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ८९ वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.

000000000000000000

आसेगाव परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

वाशिम : आसेगाव परिसरातील गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजनाही प्रभावित होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे चित्र दिसते.

00000000000000000000

करडा परिसरात वीजपुरवठा खंडित

वाशिम : रिसोड तालुक्यातील करडा परिसरातील काही गावांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी सोमवारी केली आहे.

00000000000000000

विहीर अधिग्रहण करण्याची मागणी

वाशिम : रिसोड तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहीर अधिग्रहण करण्यात यावे तसेच टँकरने पाणीपुरवठा करावा, विशेष नळ दुरुस्ती योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

०००

मेडशी येथे आरोग्य तपासणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

००

देयके अदा करण्याचे आवाहन

वाशिम : जिल्ह्यातील ६५ हजारांवर ग्राहकांकडे ४२ कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन महावितरणने केले.

००

हातपंप बंद; ग्रामस्थांची गैरसोय

वाशिम : रिसोड ते वाशिम मार्गावरील पाच बसथांब्यावरील हातपंप गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्याने प्रवाशांची पाण्यासंदर्भात गैरसोय होत आहे. हातपंपाची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

०००

Web Title: 3 more patients at Bhar Jahagir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.