नव्याने २७५ बाधित; ४७२ जणांना डिस्चार्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:44 IST2021-05-20T04:44:57+5:302021-05-20T04:44:57+5:30

वाशिम : गत एका महिन्यानंतर पहिल्यांदाच बुधवार, १९ मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या सर्वांत कमी आढळून आली आहे. बुधवारी नव्याने ...

275 newly affected; 472 discharged | नव्याने २७५ बाधित; ४७२ जणांना डिस्चार्ज !

नव्याने २७५ बाधित; ४७२ जणांना डिस्चार्ज !

वाशिम : गत एका महिन्यानंतर पहिल्यांदाच बुधवार, १९ मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या सर्वांत कमी आढळून आली आहे. बुधवारी नव्याने २७५ रुग्ण आढळले तर ४७२ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, १९ मे रोजी आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. गत तीन दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे. गत एका महिन्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या निचांकीवर आली आहे. वाशिम तालुक्यात तर केवळ ६३ रुग्ण आढळून आले आहेत. वाशिम शहरातील बाजारपेठेतील गर्दी ओसरल्याचे चांगले परिणाम यानिमित्ताने समोर येत असल्याचे बोलले जात आहे. बुधवारच्या अहवालानुसार रिसोड तालुक्यात सर्वाधिक ७५ रुग्ण आढळून आले आहेत तर सर्वांत कमी रुग्ण मानोरा तालुक्यात ८ आढळून आले. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सरासरी ४५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. बुधवारी कमी संख्येत रुग्ण आढळून आल्याने आणि त्या तुलनेत दीडपटीने रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना किंचितचा दिलासा मिळत आहे. दरम्यान, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंदही बुधवारी घेण्यात आली. जिल्ह्याबाहेरील २९ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३६८७१

००००००००००००

४१६९ सक्रिय रुग्ण

बुधवारच्या अहवालानुसार नव्याने २७५ रुग्ण आढळून आले तर ४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४१६९ रुग्ण सक्रिय आहेत.

मंगळवारी आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण

वाशिम- ६३

मालेगाव- ३७

रिसोड- ७५

मंगरूळपीर- १५

कारंजा- ४८

मानोरा- ८

Web Title: 275 newly affected; 472 discharged