लाॅकडाऊन काळात बंद झालेल्या ‘त्या’२७ बसफेऱ्या अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:46+5:302021-02-06T05:16:46+5:30

लाॅकडाऊनपूर्वी सुरू असलेल्या बसेसपैकी २७ बसेस सुरू न झाल्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही गावांत प्रवासीसंख्या नसल्याने ...

The 27 buses that were closed during the lockdown are still closed | लाॅकडाऊन काळात बंद झालेल्या ‘त्या’२७ बसफेऱ्या अद्याप बंदच

लाॅकडाऊन काळात बंद झालेल्या ‘त्या’२७ बसफेऱ्या अद्याप बंदच

लाॅकडाऊनपूर्वी सुरू असलेल्या बसेसपैकी २७ बसेस सुरू न झाल्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही गावांत प्रवासीसंख्या नसल्याने बस रिकामीच जायची व यायची. तर काही गावांतील रस्त्यांची कामे सुरू असल्याने सदर २७ बसेस सुरू करण्यात आली नसल्याचे आगारांच्या वतीने सांगण्यात आले.

वाशिम आगारात लाॅकडाऊनपूर्वी ५३ बसेस सुरू हाेत्या तर आता ४५ सुरू आहेत. ८ बसेस बंद दिसून येत आहेत. तर कारंजा आगारातून लाॅकडाऊनपूर्वी ४५ बसेस सुरू हाेत्या. सद्यस्थितीत ३५ बसेस सुरु आहेत. काेराेनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने या बसफेऱ्या बंद असल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले. रिसाेड येथे ४५ बसेसपैकी ४२ बसेस सुरू आहेत. रिसाेड आगारातील केवळ ३ बसेस सुरू हाेऊ शकल्या नाहीत. कारण, शेलु खु, नावली, मालेगाव, हराळ , गाेरेगाव या रस्त्यांची कामे सुरु असल्याचे सांगण्यात आले. मंगरुळपीर येथे लाॅकडाऊपूर्वी ४६ बसेस सुरू हाेत्या. आता ३८ सुरू असल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले. काेराेनामुळे आजही अनेक ग्रामस्थ बसने प्रवास टाळत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी आगारात प्रवाशांची गर्दी माेठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

......................

काेराेनाकाळात बंद झालेल्या बसेस हळूहळू सुरू झाल्या आहेत. काही गावांत प्रवासी नसल्याने बसेस बंद आहेत. गावकऱ्यांनी बस सुरू करण्याची मागणी केल्यास बंद असलेल्या गावांमध्येसुध्दा बसेस सुरू करण्यात येतील. काही गावांतील रस्त्यांची कामे सुरू आहेत. ती कामे पूर्ण झाल्यानंतर बसेस सुरु करण्यात येतील.

डी.एम. इलामे,

आगार प्रमुख, वाशिम बसस्थानक, वाशिम

Web Title: The 27 buses that were closed during the lockdown are still closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.