शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२५ नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

By admin | Updated: May 16, 2016 01:22 IST

३२.५३ कोटींची तरतूद : वाशिम तालुक्यासाठी सर्वाधिक निधी, मानोरा तालुक्याच्या नशिबी ‘उपेक्षा’च!

वाशिम : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राबविण्यात येणार्‍या 'मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम' या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश झाला आहे. २५ नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाने तब्बल ३२ कोटी ५३ लाख १७ हजार रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील सर्वाधिक आठ योजनांवर १४.६१ कोटी, तर सर्वात कमी मानोरा तालुक्यातील केवळ एका योजनेसाठी ८५.६0 लाखांची तरतूद आहे.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मागणी आधारित धोरणांतर्गत अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त विविध योजनांच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना, विंधन विहिरीवरील योजना, या सारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तथापि, भूजलाची घटती पातळी, पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी यासारख्या कारणांमुळे ग्रामीण पाणीपुरवठय़ावर प्रचंड ताण येत आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनामार्फत २00९-१0 मध्ये वर्धित वेग ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे करण्यात आले. भारत निर्माण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा म्हणून केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १0 एप्रिल २00९ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत समप्रमाणात ५0:५0 टक्के निधी उपलब्ध करून दिला जातो. आता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात सन २0१६-१७ ते २0१९-२0 या चार वर्षांंसाठी ह्यमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमह्ण राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या गावांची नावे राज्य शासनाने ७ मे रोजी जाहीर केली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ३२.५३ कोटींची तरतूद केली आहे. वाशिम तालुक्यातील आठ योजनांसाठी १४ कोटी ६१ लाख ४0 हजार रुपये, मंगरुळपीर सहा योजनांसाठी ५ कोटी ९३ लाख रुपये, रिसोड चार योजनांसाठी ४ कोटी ४९ लाख १७ हजार रुपये, मालेगाव तीन योजनांसाठी ३ कोटी ७१ लाख रुपये, कारंजा तीन योजनांसाठी २ कोटी ९३ लाख रुपये, तर मानोरा तालुक्यातील एका योजनेसाठी ८५ लाख ६0 रुपयांची तरतूद केली आहे.